TOP 100 Headlines : Maharashtra News Updates : Superfast News : 27 Sep 2025 : ABP Majha
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज तारखेनुसार शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. २७ सप्टेंबर १९२५ रोजी नागपूरमध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. शताब्दी वर्षानिमित्त आज संध्याकाळी नागपूरमध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन होणार आहे. यशवंत स्टेडियम, कस्तुरचंद पार्क मैदान आणि हॉकी मैदान अशा तीन ठिकाणाहून निघून ही पथसंचलनं सीताबर्डी परिसरातल्या वरायटी चौकावर पोहोचणार आहेत. अमरावतीत ५ ऑक्टोबरला दसरा महोत्सव कार्यक्रम होणार आहे. अतिवृष्टीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बदल होण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांनी लगेच जिल्हा परिषद निवडणुका घेणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. बीडमध्ये होणारा ओबीसी महा एल्गार मेळावा पावसाच्या परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी, “ज्यांच्या आवाहनानंतर आम्ही आंदोलन उभं केलंय ते आमच्या मागे कुठेच नाहीत. आंदोलनासाठी एका पैशाची मदत नाही,” असं म्हटलं. अहिल्यानगरमध्ये आरंगाव बाह्यवळण रस्त्यावर हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. पंतप्रधान मोदी ८ आणि ९ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा पूरस्थितीबाबत नसून फिनटेक फेस्टिवलसाठी होणार असून, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन मोदी करणार आहेत. मुंबईत उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटीवरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म १ ऑक्टोबर ते १९ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची ७ विमानं पाडल्याचा कोणताही पुरावा नसताना दावा केला.