Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आरएसएस आणि भाजपा अॅक्शन मोडवर : ABP Majha
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता आरएसएस आणि भाजपा अॅक्शन मोडवर आलीय. मुंबईच्या उत्तन येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आज आणि उद्या असे दोन दिवस बैठका होणार आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तर रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित राहणार आहेत. या बैठकांमध्ये लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणारेय.