Rohit Sharma Fitness | हिटमॅनचा 'फिट अँड फाइन' लुक, १० किलो वजन घटवले Special Report

Continues below advertisement
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. रोहितने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल दहा किलोपेक्षा जास्त वजन घटवले आहे. मुंबईकर सहकारी आणि भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने रोहितच्या या फिटनेस प्रवासात मदत केली. नायरने शेअर केलेल्या फोटोला "दहा हजार ग्रॅम म्हणजेच दहा किलो कमी करूनही अजून आमची मेहनत सुरू आहे," असे कॅप्शन दिले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी रोहित शर्माने अभिषेक नायरच्या मदतीने फिटनेसवर काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बंगळुरूत प्रॅक्टिससाठी नेट्समधे आल्यावर अनेकांना त्याच्या बदलाची जाणीव झाली. रोहितने एनसीएमधे योयो टेस्ट आणि डीएस्कॅन टेस्टसारख्या फिटनेस टेस्ट पास केल्या. फेब्रुवारी महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर आयपीएलमध्ये त्याच्या वाढलेल्या वजनामुळे टीका झाली होती. आता त्याची मेहनत पाहून क्रिकेट चाहत्यांना येत्या वीस ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडे सामन्यांमध्ये 'हिटमॅन' रोहितचा 'सुपरहिट शो' पाहण्याची उत्सुकता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola