Ajit Pawar - Sharad Pawar पवार काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? स्थानिक निवडणुकीत नवं समीकरण
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'पक्ष फोडल्यामुळे आमचा भाजपवर राग आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी आहे', असे सूचक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे. शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या बैठकीत, स्थानिक पातळीवर भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी युती करण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये, म्हणजेच काका-पुतण्यामध्ये, पुन्हा दिलजमाई होणार का, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement