Land Row: 'जागा धोकादायक दाखवून ताब्यात घेतली', भाजपच्या Mumbai Office वरुन Rohit Pawar यांचा सवाल

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबईतील (Mumbai) भाजपच्या (BJP) नवीन कार्यालयाच्या जागेच्या भूखंडावरून गंभीर आरोप केले आहेत. पवार यांनी म्हटले आहे की, 'ही जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची (Maharashtra Housing Finance Corporation) नव्व्याण्णव वर्षे लीजवर घेतलेली आहे, इमारत धोकादायक आहे असं दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन होत असल्याची चर्चा सुरू आहे'. एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) प्रकरणावरून रोष असताना, भाजप कार्यालयाच्या जागेबाबत अशा चर्चा सुरू झाल्यास जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही पवार म्हणाले. त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर तातडीने खुलासा करणे योग्य राहील, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये केली आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात या कार्यालयाचे भूमिपूजन आज पार पडले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola