Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला, रोहित पवारांची टीका
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'आता कुबड्यांची गरज नाही' या वक्तव्याचा संदर्भ देत, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटांना सावध केले आहे. रोहित पवार म्हणाले, 'कालच अमितभाईंनी सांगितलंय की आता कोणाच्याही कुबड्यांची आम्हाला गरज नाही. आता शतप्रतिशत भाजपा अशा प्रकारचा वेत असेल तर भाजपचा आतापर्यंतचा प्रवास बघितला की ते मित्रांचा फक्त वापर करतात आणि नंतर सोडून देतात'. यासोबतच, VSI (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) च्या चौकशीच्या आदेशांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्यानंतर आता भाजपने बारामतीकडे मोर्चा वळवला असून, राजकीय द्वेषातून संस्थांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement