Rohit Pawar | महापरीक्षा पोर्टल तात्काळ बंद करावं, रोहित पवारांची विधानसभेत मागणी | ABP Majha

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद करुन महापोर्टलही तात्काळ बंद करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलला स्थगिती दिली असली तरी महापोर्टलही तात्काळ बंद करावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली. मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलला स्थगिती दिली त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, तोपर्यंत महापोर्टलला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola