Rohit Pawar Full PC : नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, रोहित पवारांचा रोख कुणावर?

Continues below advertisement

Rohit Pawar Full PC : नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, रोहित पवारांचा रोख कुणावर?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सुत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळच्या वाल्मिक कराडवरती ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात देखील हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. अशातच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आर.आर.आबा आणि विलासराव देशमुखांचं नाव घेत मुंडेंना (Dhananjay Munde) राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. हे प्रकरण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. हे सगळं होऊ द्या. सहा महिन्यानंतर पुन्हा तुम्ही मंत्रीपद घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram