Rohit pawar On Ajit Pawar : सुनेत्रा काकींचा उमेदवारीचा निर्णय दादांचा नसेल याची खात्री होती

Continues below advertisement

Rohit pawar On Ajit Pawar :  सुनेत्रा काकींचा उमेदवारीचा निर्णय दादांचा नसेल याची खात्री होती

दादांनी ओळखलय.... मलाही वाटत होतं की तो त्यांचा वैयक्तिक निर्णय नव्हता. केंद्रातील गुजराती नेत्यांनी दादांवर दबाव आणला.‌  * *विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात देखील असाच दबाव आणला जाऊ शकतो. माझ्या मतदारसंघात महायुतीकडून मोठी लावण्यात येतेय. अनेक उमेदवार माझ्या विरोधात उभे राहू शकतात.  काही सर्वेक्षणात माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उभे करता येईल याची चाचपणी सुरू आहे. भाजपचा एखादा मोठा नेताही माझ्या विरोधात उभा राहू शकतो. मात्र माझ्या मतदारसंघातील जनता निष्ठेला महत्त्व देईल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहिला हा विश्वास. * बारामतीत कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय शरद पवार घेतील. अजित पवार जर मनातून करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. ते परत येतील का हे माहीत नाही, याचा निर्णय शरद पवार ठरवतील. पण अजित पवारांनी २०० कोटी रुपये खर्च करून नेमलेल्या डीझाईन बॉक्स या कंपनीने सांगितल्याप्रमाणे बोलत असतील तर अजित पवार खुपचं बदलले आहेत असं म्हणावं लागेल ‌. पण जर इतरांच्या सल्ल्याने अजित पवार बोलत असतील तर अजित पवारांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग काय? * सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे. त्यांनीच मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण हाणून पाडले. * आधी सर्वपक्षीय बैठक झालीय.‌पुन्हा बैठक करण्याची गरज काय. फक्त दोन्ही समाजाला खेळवत ठेवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. * राज ठाकरे दिल्लीच्या सांगण्यावरून शरद पवारांवर टिका करतायंत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram