Rohit Pawar Protest : शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर उपोषण
Continues below advertisement
आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या (farmer loan waiver) मागणीसाठी देहू (Dehu) येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. 'जे काही विचार संतांनी दिले होते ते ते बाजूला सारून एक वेगळेच मनोवादी विचार या समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते,' असा थेट आरोप रोहित पवार यांनी सरकारवर केला आहे. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या सावकारीच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून जगातील पहिली कर्जमाफी मानवतेच्या भूमिकेतून केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. महाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्जमाफी केली होती, मात्र सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून प्रत्येक शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, असेही पवार म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement