Rohit Pawar ED Inquiry : नऊ तासांनंतर रोहित पवारांची आजची ईडी चौकशी संपली
Rohit Pawar ED Inquiry : नऊ तासांनंतर रोहित पवारांची आजची ईडी चौकशी संपली
सणासुदीच्या दिवशी किंवा कौटुंबिक कार्यक्रमावेळी पवार कुटुंब एकवटल्याचं आपण अनेकदा पाहिलंय.. आजही असंच चित्र पहायला मिळालं.. निमित्त होतं रोहित पवारांच्या ईडी चौकशीचं. आज पुन्हा रोहित पवारांची ९ तास ईडी चौकशी झाली. त्यावेळी रोहित पवारांसाठी पवार कुटुंब मैदानात उतरल्याचं पहायला मिळालं.. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, रोहित पवारांचे वडिल, पत्नी कुंती पवार असं संपूर्ण कुटुंब ईडी कार्यालयाबाहेर पोहोचलं..