Rohit Pawar : कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, कारवाई झालीच पाहिजे - रोहित पवार
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवरून त्यांनी निवडक कारवाईचा मुद्दा उपस्थित केला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणात सरकार पुरावे असूनही कारवाई करत नसल्याचा आरोप केला. 'मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर कारवाई होत नाही, पण भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर सुपरफास्ट कारवाई होते', असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी CIDCO जमीन घोटाळा, नाशिकमधील बिल्डरांचा गैरव्यवहार आणि MIDC च्या जमिनीचे प्रकरण यांसारख्या अनेक प्रकरणांचा उल्लेख करत सरकार फक्त सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप केला. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येच्या कटाचा आरोप केल्यानंतर मुंडेंनी दिलेल्या नार्को टेस्टच्या आव्हानावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement