ED Chargesheet | Rohit Pawar PMLA कोर्टात हजर, सिंचन घोटाळ्यात 303 कोटी परत देण्याचे आदेश

आमदार रोहित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विशेष PMLA कोर्टात हजर झाले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत कोर्टाने त्यांना समन्स बजावले होते. रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे व्यावसायिक भागीदार राजेंद्र इंगोले यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. कोर्टात त्यांनी सांगितले की, "न्यायव्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि ईडीनं ज्या पद्धतीने ही चार्जशीट फाइल केलेली नाही ते इन्वेस्टिगेशन केलेलंय ते चुकीचं आहे." मूळ FIR मध्ये आपले नाव नसतानाही आपल्याला समन्स आल्याचे आणि चौकशी केल्याचे त्यांनी नमूद केले. ईडी राजकीय दृष्टिकोनातून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचवेळी सिंचन घोटाळ्याशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाने सिंचन घोटाळ्यातील आरोपी कंत्राटदाराला तीनशे तीन कोटी रुपये परत देण्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता, मात्र आता ते मुख्यमंत्री असताना सरकारला हे पैसे परत द्यावे लागत आहेत. त्यावेळेस केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते आणि त्यात तथ्य नव्हते, असे मत व्यक्त करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola