Rohit Pawar : VSI चौकशी: 'ऑपरेशन लोटस 2' मधून पवारांना लक्ष्य?
Continues below advertisement
Vasantdada Sugar Institute (VSI) चौकशीच्या आदेशांवरून रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'आता आम्हाला कुबड्याची जरुरत नाही,' या अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, 'ऑपरेशन लोटस टू' मधून आता अजित पवार आणि शिंदेंची गळचेपी सुरू झाली आहे का?, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. ठाण्याची ताकद कमी केल्यानंतर आता भाजपने मोर्चा बारामतीकडे वळवला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, राजू शेट्टी यांनी चौकशीचे स्वागत करताना म्हटले की, शरद पवार किंवा पवार कुटुंबीयांनी काही अनियमितता केली नसेल, तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. VSI चे विश्वस्त हेच साखर कारखानदार असल्याने, संस्थेचे शास्त्रज्ञ मालकांच्या बाजूनेच अहवाल देतील, शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, असे म्हणत त्यांनी हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement