Rohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदार
Rohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदार
हेही वाचा :
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal) जाहीर झाले आहेत. यंदाच्या निकालात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदाची खरी लढाई होती, शिवसेनेच्या (Shiv Sena) अस्तित्वाची, खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नांची उत्तरं राज्याला मिळाली. या निवडणुकीत मतदारराजानं शिंदेंच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. निकाल लागला, महायुतीला घवघवीत यश मिळालं, शिंदेंच्या पदरातही मतदार राजानं मतांचं दानही टाकलं. पण, निवडणुकांमधील दणदणीत यशानंतरही एकनाथ शिंदे यांना एक चिंता सतावते, ती म्हणजे, आमदार फुटण्याची. आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार वांद्रे येथील ताज लँड्स एंड (Taj Lands End) हॉटेलमध्ये राहणार आहेत. शपथविधीपर्यंत सर्वांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे पक्षनेते निवडण्याची प्रक्रियाही हॉटेलमध्येच होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं धमाकेदार कामगिरी केली. शिवसेनेनं आतापर्यंत 54 विधानसभेच्या जागा जिंकल्या असून 3 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात 1.2 लाख मतांनी विजय मिळवला.