Rohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझा

Continues below advertisement

Rohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील (rohit patil) यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी टाकल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही, आज 9 सदस्य उपस्थित होते, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ 49 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. त्यामध्ये, 20 जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने 17 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं. त्यामुळे, महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता व प्रतोद यांची निवड केली होती. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही गटनेता, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार, कळवा-मुंब्रा विधानसभेतून आमदार बनलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे गटनेते बनले आहेत. तर, मुख्य प्रतोदपदी दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना प्रतोदपदी नियुक्ती देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram