Rohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ
Rohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ
कोल्हापुरातील एका तरुणाची इसरो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालीये...रोहित पाटील असं याच नाव आहे. राधानगरी तालुक्यातील मालवे या छोट्याशा गावातून त्याचा प्रवास सुरु झाला...आई-वडील शेतकरी, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच पण आपल्या मुलाने शिकाव, नाव कमवाव, ही त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळे कितीही आर्थिक संकटे आली तरी कुटुंबाने शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. आई-वडिलांच्या याच संघर्षाला यशाचे कोंदण लावत राधानगरीतल्या मालवे येथील रोहित विद्या लक्ष्मण पाटील या मुलाने थेट 'इस्रो 'मध्ये शास्त्रज्ञ म्हणून झेप घेतली आहे. मालवेसारख्या आडवळणाच्या गावातील या मुलाने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे... शास्त्रज्ञ रोहित पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....