Rohit Arya Encounter : रोहित आर्यने दीपक केसरकरांशी संवाद साधण्यासाठी मागणी केली होती- सूत्र
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे एका स्टुडिओमध्ये तब्बल १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यातील वाद आता समोर आला आहे. 'माझा कोणावरही विश्वास नसून यापुढे संवाद साधू नका,' अशी भूमिका रोहित आर्यनं पोलिसांकडे मांडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री असताना दीपक केसरकर यांनी आर्यला सरकारच्या 'स्वच्छता मॉनिटर' या प्रोजेक्टच्या समन्वयाची जबाबदारी दिली होती, मात्र त्या कामाचे पैसे थकवल्याचा आरोप आर्यनं केला होता. यापूर्वीही आर्यनं थकबाकीसाठी उपोषण आणि पत्रव्यवहार केला होता, पण दाद न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. अखेरिस, पोलीस कारवाईत गोळी लागल्याने आर्यचा मृत्यू झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement