Powai Encounter: पवईतील ओलिस नाट्य, पोलिसांकडून स्टुडिओतील साहित्य जप्त

Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे झालेल्या थरारक ओलिसनाट्यात (Hostage) आरोपी रोहित आर्याचा (Rohit Arya) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. आरोपीने ऑडिशनच्या नावाखाली १७ मुलांना ओलिस ठेवून 'त्यांना पेटवून देण्याची धमकी' दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला. यावेळी आरोपीने पोलिसांवर एअर गनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, प्रत्युत्तरादाखल सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्टुडिओमधून पिस्टल, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्युशन आणि लायटर जप्त केले आहेत. या कटाची योजना पुण्यापासून (Pune) करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola