Pradeep Sharma : एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक - प्रदीप शर्मा

Continues below advertisement
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य (Rohit Arya) याच्या पोलीस एन्काउंटर प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या एन्काउंटरला बनावट ठरवत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे, माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. 'माझं मत असं आहे की जे काही झालंय ते योग्य झालेलं आहे,' असे प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे. शर्मा यांच्या मते, पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून १७ लहान मुलांना वाचवले. आरोपी रोहित आर्य याने स्टुडिओच्या फ्लोअरवर केमिकल स्प्रे केले होते आणि आग लागल्यास मोठा धोका निर्माण झाला असता, त्यामुळे पोलिसांची कारवाई योग्य होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. याउलट, हा एन्काउंटर टाळता आला असता, असा दावा करत वकील नितीन सातपुते यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola