Ritiesh Deshmukh : अमित भैय्या...ती वेळ आलेली आहे...पाऊल उचललं पाहिजे; रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य

Continues below advertisement

Ritesh Deshmukh Speech on Father Vilasrao Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली, हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावक भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं.

वडिलांची उणीव भासते : रितेश देशमुख

रितेश देशमुख वडिलांची आठवण काढत म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे, साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका घेतली. वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश म्हणाला की वडिलांची उणीव नेहमीच भासते, पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले.  काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेश देशमुखने काका दिलीपरावांबद्दलचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram