Uday Samant : Rikshaw Taxi Union ने 15 सप्टेंबरचा संप मागे घेतल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती

Continues below advertisement

 मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी १५ सप्टेंबरचा नियोजित संप मागं घेतल्याची माहिती मंंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, आपण टॅक्सी, रिक्षा संघटनेशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. या संघटनांना तुम्ही संप करू नका, त्याचा त्रास नागरिकांना होऊ शकतो, अशी विनंती केल्याची माहिती सामंतांनी दिली. रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या दरवाढीच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत, अशी माहितीही सामंतांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram