MVA Rift: 'उद्धव ठाकरेंसोबतही नाही', भाई जगतापांचा बॉम्ब, मुंबईत महाविकास आघाडीत मोठा ट्विस्ट?
Continues below advertisement
काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे महाविकास आघाडीत (MVA) मुंबईच्या राजकारणावरून मतभेद उघड झाले आहेत. 'मुंबईमधे राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस निवडणूक लढणार नाही', असे खळबळजनक विधान भाई जगताप यांनी केले आहे. त्यांच्या मते, मुंबईतील कार्यकर्त्यांची मनसे (MNS) किंवा शिवसेना (UBT) सोबत निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही, त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर लढावे. मात्र, पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. याउलट, विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव आणि राज) एकत्र आल्यास भाजपच्या 'गुजराती चेहऱ्या'विरोधात मराठी मतांचा फायदा होईल, असे म्हणत वेगळा सूर लावला आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड आणि शरद पवार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement