Shivsena News : भाजपनंतर शिवसेनेची पदाधिकाऱ्यांचीही स्वबळाची भाषा, उदय सामत काय म्हणाले?
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे (Thane), रायगड, नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये स्वबळाची मागणी जोर धरू लागली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 'काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद शिंदे साहेबांच्या किंवा देवेंद्रजींच्या उंचीचं आहे का याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कारण युतीचे सर्व अधिकार फक्त तीन नेत्यांनाच आहेत,' अशा शब्दांत एका नेत्याने स्वबळाची मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे. ठाण्यात तर भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) संघर्ष अधिकच तीव्र झाला असून दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आमदार संजय केळकर यांनी भाजपचा महापौर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात झालेल्या शिवसेना बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांकडून विकासकामात अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement