Konkan Politics: कोकणात महायुतीत ठिणगी, शिवसेना-ठाकरे गट युतीच्या चर्चेने राणे संतप्त
Continues below advertisement
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, कट्टर राजकीय विरोधक असलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात स्थानिक पातळीवर युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींवर भाजप नेते नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, 'शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केल्यास आम्ही संबंध तोडू', असा थेट इशारा दिला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या केवळ चर्चा असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटासोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका करत, आता तुमच्या शब्दाला राज्यात किंमत राहिली नसल्याचे म्हटले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र महायुती म्हणूनच लढणार असल्याचे म्हटले असले तरी, विरोधी पक्षाला फायदा होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर वेगळी रणनीती असू शकते, असे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement