Mahayuti Crack: कर्जतमध्ये दादांची शिंदेंना सोडचिठ्ठी? आमदार Thorve 'ना 'टप्प्यात घेण्यासाठी' ठाकरेंना साथ

Continues below advertisement
रायगडच्या राजकारणात (Raigad Politics) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या नव्या पॅटर्नची चर्चा सुरू आहे. कर्जतमध्ये (Karjat), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने, शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांना राजकीय आव्हान देण्यासाठी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. 'उपमुख्यमंत्री शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील घटक पक्ष एकत्र आल्याची' चर्चा या घोषणेनंतर सुरू झाली आहे. रायगडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. याच राजकीय समीकरणांमुळे कर्जतमध्ये आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र लढणार आहेत. कर्जतमधील रेडियंट ब्ल्यू रिसॉर्टमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे कोकणातील महायुतीची (Mahayuti) राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola