Shivsena vs BJP Karad : 'पूर्ण सातारा जिल्ह्यात स्वतंत्र लढणार', शिवसेनेचा भाजपला थेट इशारा

Continues below advertisement
साताऱ्याच्या कराडमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून महायुतीमध्येच बिघाडी झाली आहे. भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही (शिंदे गट) राजेंद्रसिंह यादव (Rajendrasinh Yadav) यांना उमेदवारी जाहीर केल्याने थेट संघर्ष निर्माण झाला आहे. 'पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे,' असा थेट इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे. कराड शहरासाठी आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून राजेंद्रसिंह यादव यांचे नाव निश्चित झाले असून, शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच ही निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. या अनपेक्षित खेळीमुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola