Naresh Mhaske : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत स्वबळाचे वारे?
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये, विशेषतः ठाण्यात तणाव निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नेते स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहेत, तर दुसरीकडे भाजपही स्वतंत्रपणे तयारी करत आहे. 'आमच्याही नगरसेवक आणि विभागप्रमुखांना वाटणार ना की आमचेही महापौर होईल,' या एका नेत्याच्या विधानातून युतीतील अंतर्गत महत्त्वाकांक्षा आणि कुरबुरी समोर आल्या आहेत. काल आनंद आश्रमात खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, शिवसेना करत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे पदाधिकारी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला. यानंतर, शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे, तर भाजपनेही आमदार संजय केळकर यांच्या 'महापौर भाजपचाच' या घोषणेनंतर ३३ प्रभागातील इच्छुकांसाठी शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement