Mahayuti Election : महायुतीत मोठी फूट? अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा

Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे, तर ठाण्यातही भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरू आहेत. 'असा कोई सगा नहीं जिसको भाजपाने ठगा नहीं,' असं म्हणत शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपचे नवनाथ बन यांनी राऊत यांना 'गँग्स ऑफ ठगचे सरदार' म्हटले आहे. राज्यात ठाणे, परभणी, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, आणि जळगावसह अनेक ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, मित्रपक्षातील नगरसेवक फोडत असल्याने शिवसेनेने भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींमुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola