Ajit pawar On Mahayuti : महापालिका युतीत अडथळा? अजित पवारांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमध्ये मतभेद उघड झाले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर भाजपच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीला विरोध होत असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी 'एकवेळेस शिंदे चालतील, पण राष्ट्रवादीसोबत युती नको' असा सूर लावल्याची माहिती आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात पुणे, मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार असून, जागावाटपावरून महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola