Sindhudurg Nitesh Rane : 'सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होणार, नितेस राणेंची माहिती
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद उफाळून आले आहेत. सिंधुदुर्ग (Sindhudurg), भंडारा-गोंदिया, सोलापूर (Solapur) आणि हिंगोलीमध्ये (Hingoli) भाजप (BJP) नेत्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. 'ईट का जवाब पत्थर से देना हा भारतीय जनता पार्टी वाले जाणते हे,' असा थेट इशारा हिंगोलीत भाजपचे तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, तर भंडारा-गोंदियामध्ये महायुती होणार नाही, असे परिणय फुके यांनी जाहीर केले आहे. सोलापूर जिल्हा परिषद स्वबळावर जिंकण्याचा विश्वास भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement