Eknath Shinde Scheme : शिंदेंची 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' योजना बंद? सरकार म्हणतंय..
Continues below advertisement
राज्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' योजनेवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन (Navnath Bhan) आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वक्तव्यांनी या चर्चेला तोंड फुटले आहे. 'आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामहून नको असाव्यात,' असे वक्तव्य भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन यांनी केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी सुरू केलेली 'आनंदाचा शिधा' योजना निधीअभावी बंद झाल्यानंतर, आता 'माझी शाळा, सुंदर शाळा' योजनेलाही ब्रेक लागल्याची चर्चा आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे की, २०२५-२६ या वर्षासाठी हे अभियान नवीन उपक्रमांसह लवकरच राज्यभरात राबविण्यात येणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement