Maharashtra Politics: 'थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करणार', Karjat मध्ये दादांच्या NCP ची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी!
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कर्जतमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक वाद उफाळून आला आहे, ज्यामध्ये आमदार भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष प्रमुख आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे, 'उपमुख्यमंत्री शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमधले घटक पक्ष एकत्र येत आहेत' अशी चर्चा सुरू झाली आहे. या नव्या समीकरणानुसार, कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देत थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. कर्जत येथील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या बैठकीत ही 'कर्जत विधानसभा परिवर्तन विकास आघाडी' जाहीर करण्यात आली. त्यामुळे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement