Congress Politics: 'बाळासाहेब थोरातांचं दार ठोठावणार', Nashik मध्ये Rahul Dive यांचे प्रदेशाध्यक्षांना आव्हान

Continues below advertisement
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसेसोबत (MNS) युती करण्यावरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र असून नाशिकमधील (Nashik) एका बैठकीमुळे हा गोंधळ वाढला आहे. 'मी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं दार ठोठावणार', असे म्हणत काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे (Rahul Dive) यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkale) यांना आव्हान दिले आहे. नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन स्थानिक निवडणुका सोबत लढवण्याचे जाहीर केले, ज्यात राहुल दिवे सहभागी होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आघाडीला तीव्र आक्षेप घेत बैठकीला उपस्थित नेत्यांना नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मात्र राहुल दिवेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने काँग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे समोर आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola