RFO Transfer Issue : वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली ऑनलाईन पद्धतीनं करा, पाहा कुणी केली मागणी
वन परिक्षेत्र अधिकारी अर्थात RFO यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना वन खात्यात 200 अधिकाऱ्यांच्या बदल्या पैसे घेऊन करण्यात आल्या, असा आरोप करण्यात आला. एबीपी माझानंच ही बातमी दाखवली होती. केवळ RFO नव्हे तर वन विभागातील इतर सर्व बदल्या ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात याव्या अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेनं केली आहे.