Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

Continues below advertisement

Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले. छत्रपती संभाजीनगर मधील खाजगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. नरेंद्र चपळगावकर यांनी वर्ध्यामधील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं होतं. नरेंद्र चोपळगावकर हे लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. गरवारी गरवारी पॉलिएस्टर लिमिटेडचे ते स्वतंत्र अकार्यकारी संचालक होते. नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त होते. महाराष्ट्र फाउंडेशन ना 2021 मध्ये त्यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार दिला होता. तर मुंबईच्या हायकोर्टाच्या मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. वर्ध्यामध्ये झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्षपद त्यांनी भुशवलेल होतं. 1961-1962 मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे ते पहिले प्रमुख होते. गरवारी पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. नरहर कुरुंदकर न्यासाचे ते विश्वस्त होते. महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कारान त्यांना सन्मानित करण्यात आलाय. द लास्ट निजाम अँड हिज पीपल या नावाच पुस्तक त्यांच कमालीच गाजलं. 22 पुस्तकांच त्यांनी लेखन केल. 1962 ते 1978 या काळामध्ये बीड मध्ये त्यांनी सुद्धा केली. 1979 ते 1981 या काळामध्ये मुंबई हायकोर्टात वकीले केली. 1981 पासून औरंगाबाद खंडपीठाचे ते न्यायमूर्ती झाले. मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून 19 जानेवारी 1990 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. कायमचे न्यायमूर्ती म्हणून 20 नोव्हेंबर 1990 ला त्यांची नियुक्ती झाली. 19 एप्रिल 1999 ला न्यायमूर्ती चपळगावकर हे निवृत्त झाले. चंपावती विद्यालय, दयानंद महाविद्यालय, संभाजीनगरच्या पहाडे महाविद्यालयामध्ये काही काळ त्यांनी अध्यापन केलं. बीड मधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्र साठी त्यांनी लेखन केलं. तर आज न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच निधन झालंय आणि आपल्यासोबत सध्या ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आहेत. देशमुख सर, आपल्या सगळ्यांसाठीच ही अत्यंत दुःखद बातमी आहे. चपळगावकर सर आता आपल्यात नाहीयत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram