Retail edible oil prices drop : फोडणी स्वस्त, खाद्यतेल लीटरमागे 3 ते 4 रुपयांनी स्वस्त होणार
Continues below advertisement
आता गृहिणी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी... आता खाद्यपदार्थांची फोडणी स्वस्त होणार. कारण खाद्यतेलाच्या किमती लीटरमागे ३-४ रुपयांनी स्वस्त होणार आहेत. कोरोना काळ आणि लॉकडाऊनमुळे खाद्यतेलांच्या किमतीत मोेठी वाढ झाली होती. तेलबियांचे वाढलेले देशांतर्गत उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घटलेल्या मागणीमुळे तेलदरात फरक पडू शकतो, अशी माहिती इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एस्क्ट्रॅक्टर्स असोसिएशननं दिलीए. आयात शुल्कातही कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती मागील महिन्याभरात ८ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. आणि येत्या काही दिवसात आणखी ३ ते ४ रुपयांनी खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement