Solapur Siddheshwar Yatra | सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वरांच्या यात्रेवर निर्बंध
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रेसाठी मंदिर समितीने पाठवलेल्या प्रस्तावावरुन आज रात्री उशीरा प्रशासनाने आपले आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध मर्यादा घालून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना यात्रा काळात मंदिरात प्रवेश बंद असणार आहे.