Prabhani Corona | कोरोनामुळे परभणी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक; 22 ते 31 मार्च दरम्यान बससेवा बंद

Continues below advertisement

परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी निर्बंध आणखी कडक केले आहेत. परभणी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा चालणारी खाजगी व एसटीची प्रवासी वाहतुक 22 ते 31 मार्च पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत शिवाय याच दरम्यान हॉटेल्स,रेस्टारंट,चहा ढेले,पाणीपट्टी हि बंद ठेवुन केवळ पार्सल सुविधा देण्याला मुभा असणार आहे.अगोदरच जिल्ह्यात सर्व आंदोलन,धार्मिक स्थळ,शाळा,महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत शिवाय 25 मार्च पर्यंत जिल्हाभरात संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागु करण्यात आलेली आहेत.महत्वाचे म्हणजे 10 दिवस एसटी पुर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याने 800 ते 900 गाड्या ह्या जागेवर उभ्या राहतील ज्यातून प्रतिदिन एसटी महामंडळाला 30 ते 40 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram