Anil Parab: अनिल परब यांनी दापोलीत बांधलेलं रिसॉर्ट बेकायदा, महसूल खात्याची लोकायुक्तांसमोर माहिती ABP Majha

Continues below advertisement

परिवहन मंत्री अनिल परब यांचं दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल आणि वनखात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी लोकायुक्तांसमोर दिलीय. रिसॉर्ट बांधण्यात आलेल्या जमिनीला बनावट कायगदपत्रांच्या आधारे चुकीच्या पद्धतीनं बिनशेती दर्जा देण्यात आल्याचं करीर यांनी सांगितलं. त्यामुळे रिसॉर्टचं बांधकाम बेकायदा आहे आणि यात सीआरझेड नियमांचंही उल्लंघन झालंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एन. कानडे यांच्यासमोर या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी झाली. तेव्हा करीर यांनी ही माहिती दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram