Religious Conversion Allegations | बीड जेलमध्ये कैद्यांवर 'धर्म परिवर्तन'साठी दबाव

Continues below advertisement
बीड जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप वकील राहुल आघाव यांनी केला आहे. कारागृह अधीक्षक पेट्रेस गायकवाड यांच्याकडून कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप आहे. तीन हिंदू आणि एका मुस्लीम कैद्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणला जात असल्याचे आघाव यांनी म्हटले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये गायकवाड यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं देखील वकील आघाव यांनी म्हटलंय. कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांनी या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल. वस्तुस्थिती तपासण्यासाठी पथक पाठवले जाणार आहे आणि जेल अधीक्षक गायकवाड यांच्याकडूनही खुलासा घेतला जाईल. अमोल चोगथियो भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण या बंद्यांकडून तक्रारपत्र मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola