Bal Bothe Arrested | अटककेवेळी बाळ बोठे यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट, पोलिसांची माहिती

Continues below advertisement

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठे याला अहमदनगरच्या पोलिसांनी जेरबंद करण्यात आलं. बाळ बोठे यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळे बोठे ज्या रूममध्ये थांबला होता त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते, अशी माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच बाळ बोठे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच त्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असंही अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. 

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांनी सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती पुढे आली. बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करू विविध जिल्ह्यांमध्ये छापे देखील टाकले. मात्र बाळ बोठे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram