Silver Oak: आंदोलनाआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलीस सूत्रांची माहिती ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी मोठा जमाव चालून गेला होता. याप्रकरणी बेकायदा जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य करणे आणि हल्याचा कट रचणे या कलमांतर्गत गुणरत्न सदावर्तेंना रात्री अटक करण्यात आलं.
Continues below advertisement