MHADA Lottery : ठाणे, पालघरसह कोकणात म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु, 12 एप्रिलपर्यंत अर्ज
Continues below advertisement
ठाणे, पालघरसह कोकणात स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ४ हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुर झालीये.. १४ भूखंडांच्या विक्रिसाठीदेखील नोंदणी सुरु झालीये.. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ घरे, 20 टक्के योजनेतील १४५६ घरे उपलब्ध आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत १४ भूखंड आणि १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असून प्रथम प्राधान्य यानुसार २०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्यात... १२ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार असून ऑनलाइन संगणकीय असणारी सोडत 10 मे रोजी काढण्यात येणार आहे..
Continues below advertisement