Dr. Babasaheb Ambedkar यांच्या नावाने आकाशातील ताऱ्याची नोंदणी,लॅपटॉप, संगणक,टॅबवर पाहता येणार तारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 132वी जयंती आहे. यंदाची ही जयंती आणखी खास होणार आहे, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची नोंदणी करण्यात आलीये. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. सर्वसामान्यांना हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार असून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदेंनी या ताऱ्याची रजिस्ट्री केलीये.