Red Fort Blast: फरीदाबाद टेरर कनेक्शन, डॉक्टरच निघाला मास्टरमाइंड, लाल किल्ल्याजवळ स्फोट

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या i20 कार बॉम्बस्फोटाने (Car Bomb Blast) देश हादरला आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद (Dr. Umar Mohammad) असून, फरीदाबाद टेरर कनेक्शन (Faridabad Terror Connection) समोर आले आहे. १० नोव्हेंबर रोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये डॉ. मुझंबी शकेलच्या (Dr. Muzambi Shakil) घरी केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) पोस्टर्स, ३६० किलो अमोनियम नायट्रेट (Ammonium Nitrate) आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. 'काश्मिरी डॉक्टरांच्या घरातून ३६० किलो अमोलियम नायट्रेटसारखी स्फोटकं, दोन एके-४७ रायफल आणि ८४ जिवंत काडतुसं जप्त केली,' अशी माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईनंतर फरार झालेल्या डॉ. उमरने स्फोटकांनी भरलेली कार बदरपूरमार्गे दिल्लीत आणून लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी तिचा स्फोट घडवला. या घटनेनंतर तपास यंत्रणांनी दिल्ली, फरीदाबाद, लखनऊ आणि काश्मीरमध्ये तपास तीव्र केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola