Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोटात जैशच्या Faridabad-Saharanpur मॉड्यूलचा हात, गुप्तचर विभागाचा संशय.

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देश हादरला आहे. या स्फोटामागे जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलचा हात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी, डॉ. उमर मोहम्मद आणि त्याचा भाऊ अमीर मोहम्मद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, 'या स्फोटांसाठी वापरण्यात आलेली हरियाणा पासिंगची कार उमर मोहम्मद याची होती आणि त्याचा थेट संबंध फरीदाबाद-सहारनपूर येथील जैश मॉड्यूलशी आहे'. या छापेमारीनंतर आणखी ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट होता, मात्र लाल किल्ल्याजवळ गाडी असतानाच स्फोट झाला, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola