Red Chilly Price Hike : लाल मिरचीचा ठसका वाढला, भाव गगनाला भिडले
Continues below advertisement
नंदुरबार : यावर्षी सर्वसामान्य माणसाच्या जेवणातील महत्वपूर्ण असलेल्या चटणीचा भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर लाल मिरचीच्या बाजारात चांगलीच तेजी आलीये. नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या 50 वर्षातील सर्वाधिक दर लाल मिरचीला मिळत असून सहा हजार पासून ते दहा हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हा दर मागील वर्षाच्या दुप्पट असून मिरचीचे हे दर कायम राहण्याचा अंदाज असल्याने चटणीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली.
Continues below advertisement