Mega Recruitment | 60 ते 70 हजार पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती: अजित पवार | ABP Majha
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार लवकरच 60 ते 70 हजार रिक्त पदांसाठी टप्प्याटप्प्याने मेगाभरती करणार आहे. सुरुवातील पोलीस दलातील आठ हजार पदं भरणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.