Record Price: देवगडचा हापूस ठरला 'सोनेरी', एका पेटीला तब्बल पंचवीस हजारांचा विक्रमी भाव!
Continues below advertisement
यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर देवगड (Devgad) हापूस आंब्याने वाशीच्या एपीएमसी (Vashi APMC) मार्केटमध्ये नवा विक्रम रचला आहे. देवगड तालुक्यातील पडघवणी गावचे आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिरसेकर यांनी पाठवलेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल पंचवीस हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. शिरसेकरांनी सहा डझन हापूस आंब्यांची ही पेटी नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली होती. फळविक्रेते हर्षल जेजुरकर यांच्याकडे दाखल झालेल्या या पेटीतील आंबे पिकल्यानंतर, तिची विक्री करण्यात आली आणि तेव्हा हा आजवरचा सर्वाधिक भाव नोंदवला गेला. यापूर्वी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला मिळालेला हा विक्रमी भाव आहे, ज्यामुळे आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement